तलवारीने प्राणघातक हल्ला! गावात खळबळ; गुन्हा दाखल

भिडी : रोजमजुरी करून स्वत:सह मुलांचा सांभाळ करणाऱ्या विधवेवर तिच्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या बाप-लेकांनी जागेच्या कारणावरून वाद करीत तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात विधवा महिला जखमी झाली. ही घटना नजीकच्या बाभुळगाव (खोसे) येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, बाभुळगाव (खोसे) येथील रुंदा संतोष तोडासे (3५) या. पतीच्या निधनानंतर रोजमजुरी करून स्वत:सह दोन मुलांचा सांभाळ करते.

तिच्याशी तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नीलेश परचाके व नीलेशचे वडील कैलास परचाके यांनी रुंदा राहत असलेल्या जागेवर आपला हक्क दर्शवित तिच्याशी वाद केला. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जवळ असलेल्या तलवारीने रुंदा हिला मारहाण करून जखमी केले, या प्रकरणी जखमीच्या तक्रारीवरून आरोपी बाप-लेकाविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here