फ्रिजचा स्फोट! जीवितहानी टळली; भोजनालयाचे मोठे नुकसान

वर्धा : लिक असलेले सिलिंडर बरोबर करतानाच अचानक फ्रिजचा कॉंम्प्रेसर जळल्याने फ्रिजचा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सावंगी येथील रुग्णालयाच्या जुन्या सायकल स्टॅन्ड असलेल्या परिसरात घडली.

सावंगी येथील रुग्णालय परिसरात बनवारीलाल ठाकूर याचे श्रीराम भोजनालय आहे. सकाळपासून भोजनालयातील स्वयंपाकगृहात असलेल्या सिलिंडरमधून गॅस गळती सुरू होती. ही बाब ठाकूर याच्या लक्षात येताच त्यांनी सिलिंडरचा लिकेज दुरुस्त करीत असतानाच लगतच्या फ्रिजला अचानक आग. लागली. दरम्यान, काही वेळात फ्रिजचे कॉम्प्रेसर फुटले. सुदैवाने उपाहारगृहात कुणीच नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, भोजनालयाचे मोठे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here