किचनमध्ये कुकरचा! स्फोट, चिमुकला बचावला; शेगावकर कॉलनीतील घटना

वर्धा : स्वयंपाक खोलीत गॅसवर लावलेला कूकर फुटल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली. सुदैवाने घरातील सदस्यांना इजा पोहचली नाही. ही घटना १० रोजी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील शेगावकर कॉलनी वॉर्ड क्रमांक पाचमध्ये घडली.

आशिष रंगराव वंजारी यांच्या घरी त्यांची पत्नी कोमल ही स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करून कूकर गॅसवर लाऊन बाहेरील अंगणात कपडे वाळविण्यासाठी गेली होती. दोन वर्षाचा मुलगा मधातील खोलीत खेळत होता. कोमल कपडे वाळवत असतानाच अचानक स्वयंपाक खोलीत मोठा आवाज झाला. कोमल धावत गेली असता तिला कूकर फुटल्याचे दिसले. गॅस शेगडी देखील तुटली.सिलिंग फॅनही वाकला. सुदैवाने मुलगा त्या खोलीत खेळत नव्हता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here