खड्डे चुकविताना कारची कारला धडक! दोन्ही कारचे मोठे नुकसान

वडनेर : नागपूर-हैद्राबाद मार्गावर दारोडा शिवारात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. असे असतानाही याच मार्गावरील वडनेर शिवारात हैद्राबादकडे जाणाऱ्या आणि हिंगणघाटच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक चारचाकी व प्रवासी तसेच अवजड वाहनांकडून मनमर्जीने टोल वसूलकेला जात आहे. असाच काहीसा जीवघेणा खड्डा चुकविण्याच्या नादात भरधाव कारने कारला धडक दिली. यात वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना दारोडा शिवारात सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, पी.बी. ०८ ई.ई. ५९८७ क्रमांकाची कार नागपूरकडून हैद्राबादच्या दिशेने जात होती. भरधाव कार दारोडा शिवारात आली असता खट्टा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अश्यातच वाहनाचा माग्रील टायर फुटला. कसाबसा वाहनावर नियंत्रण मिळविल्यावर वाहन उभे असतानाच मागाहून येणाऱ्या कार चालकाने रस्त्यावरील खड्डे चुकवित असतानाच कारला धडक देत रस्त्या दुभाजकावर चढली. या अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस जमादार खोडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here