कारची दुचाकीला धडक! दोन गंभीर; वर्धा- नागपूर महामार्गावरील कान्हापूरजवळील घटना

सेलू : दुचाकीला कट मारण्याच्या नादात कार पलटी झाली या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना वर्धा- नागपूर महामार्गावरील कान्हापूरजवळ मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार कान्हापूर येथील सूरज विनायक येळणे (25) व सागर विनायक येळणे (22) हे दोन्ही भाऊ आपल्या एम. एच. 32 ए. एल 6964 क्रमांकाच्या ऐंक्टिव्हा गाडीने सेलूवरून कान्हापूरकडे जात होते.

दरम्यान एम.एच. 46 ए. एल 0643 या लाल रंगाच्या झायलो गाडी चालकाने समद्धी मार्गाचे पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला कार आडवी केली. परंतु, दुचाकी चालकांनी प्रसंगावधान राखून गावांच्या दिशेने निघून गेले. परंतु, मागाहून येणा-या कार चालकाने कट मारून दुचाकीवरील दोघांनाही खाली पाडले. त्यानंतरही दुचाकी खाली पडेपर्यंत कारचालकाने दुचाकीला धडक मारल्या. दरम्यान, अचानक ब्रेक मारण्याच्या बेतात गाडी रोडवर पलटी झाली. कारमधील इसम गाडीच्या खाली उतरले व गाडी सरळ करीत दुचाकीस्वारांना मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत गावकरी घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

सदर अपघातात दुचाकी चालक सागरच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर त्याचा भाऊ सूरजला उजव्या हाताला , डाव्या डोळ्याखाली व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून कार पोलिस ठाण्यात जमा केली आहे. अपघातग्रस्त कार ही पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here