वर्धा : दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत युवती गंभीर जखमी झाली. ही घटना वर्धा -यवतमाळ मार्गावर सावंगी परिसरातील सैनी हॉटेल समोर मंगळवारी दुपारी घडली. यात डॉ. अंकीता मनोहर लांडगे (२६) या जखमी झाल्या. या प्रकरणी युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारिवरून दुचाकी चालकाविरुद्ध सावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सालोड येथील महात्मा गांधी आयुर्वेदीक कॉलेज मध्ये एम. एच. ३२ ए. जी ९८३८ क्रमांकाच्या दुचाकीने युवतीही वर्धेवरून जात होती. दरम्यान देवळीकडून वर्धेच्या दिशेने येणाऱ्या एम. एच. ३२ ए. जे. २२९० क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात डॉ. अंकीता मनोहर लांडगे या जखमी झाल्या. या प्रकरणी सावंगी पोलिसात मनोहर लांडगे यांनी दिलेल्या तक्रारिवरून दुचाकी चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.