वासनांध आजोबाचा चिमुरड्या नातीवर लैंगिक अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना

वर्धा – स्वतःच्या नातीवर आजोबाने अत्याचार केल्याची घटना वर्धेच्या रामनगर परिसरात उघडकीस आली आहे. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना गुरुवारी (ता. २५) रात्री घडली. याप्रकरणी एका ७० वर्षीय नराधम आजोबाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

महिला आणि तिची सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत घर असलेल्या तिच्या आई-वडिलांकडे दीड वर्षांपासून राहत आहे. रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

नराधम ७० वर्षीय आजोबा त्याच्या खोलीत चिमुरडीशी अनैसर्गिक कृत्य करताना दिसला. महिलेने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वासनांध आजोबास अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here