
पवनार : मागील दोन वर्षापासून सेवाग्राम-पवनार मार्गाचे काम संथगतीने चालू आहे. या मार्गावरील नागझरी नाल्याच्या पुलावरील बांधकाम चालू असल्याने पुलाच्या बाजूला सिमेंटच्या गोल पायल्या अंथरुन त्यावरुण तात्पूरत्या स्वरुपाचा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र काल सकाळपासून सूरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्यावरील पूल अर्धाअधिक खचला याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे, मंडळ अधिकारी प्रवीण हाडे, तलाठी संजय भोयर यांनी येत रात्रीच्या वेळी या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांसोबत दुर्घटना घडू नये याची खबरदारी म्हणून हा मार्ग बॅरीकेट लावून बंद केला. पुलाची दुरुस्ती होतपर्यंत या मार्गाचा वापर न करण्याचे प्रशासनानाकडून आवाहन करण्यात आले आहे.

















































