
येरला : हिंगणघाट मार्केटला कापूस विक्रीकरिता नेत असताना गाडीचा दोर तुटल्याने कापसाचा साठा रस्त्यावर पडून सर्वत्र पसरला. ही घटना नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील पिपरी गावाजवळ 29 डिसेंबर रोजी पहाटे घडली यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले
हिंगणघाट तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील पिपरीजवळ 29 डिसेंबरच्या पहाटे हैदराबाद कडून नागपूरकडे टेम्पो क्रमांक TS 16, U81110 कापूस घेऊन जात असताना चालत्या गाडीत दोर तुटला. परिणामी, कापूस खाली कोसळला जवळपास 13 क्विंटल कापसाचा रस्त्यावर सडा पडला. रस्त्यावर तीन ठिकाणी कापूस पसरला. यावेळी चालकाचे लक्ष जाताच गाडी थांबवून रस्ता बंद करून कापूस गोळा करण्यात आला. याप्रसंगी पिपरी येथील नागरिकांच्या मदतीने कापूस गोळा करण्यात आला. काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.


















































