ट्रकच्या अपघात महिलेसह बालक गंभीर! शासकीय रुग्णालयात दाखल

दिग्रस : दिग्रस आर्णी रोडवरील तुपटाकळी गावापासून काही अंतराबर मंगळवारी रात्री 7 वाजच्या दरम्यान आर्णीकडून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच 26 एच 7359 ने वऱ्हाड घेऊन येणाऱ्या एपे वाहनाला मागून जबर धडक दिल्याची घटना घडली.

29 डिसेंबरला डेहनी ता.दिग्रस येथील विवाह असल्याने 28 ला रात्री एपे वाहन वऱ्हाडी घेऊन दिग्रस ला येत असताना मद्यधुंद अवस्थेत असलेला ट्क चालकाने ने एपेला मागून धडक दिली. यात एपेच्या दोन-तीन पलट्या झाल्याने त्यातील प्रवासी आशा रमेश आडे यांना कमरेला इजा झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच एक बालक गंभीर जखमी असल्याचे समजते.

यावेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडच्या कडेला शेतातील सांडव्याच्या नाल्यावर जाऊन आदळल्याने ट्रक चालक अडकून पडला होता.जागृत नागरिकांनी दिग्रस पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलीस तात्काळ दाखल झाले. दिग्रस-आर्णी रोडचे काम सुरू असलेल्या ठेकेदाराच्या जेसीबीच्या साह्याने ट्रक खाली दबलेल्या चालकाला अथक प्रयत्न करून चालकाचा जीव वाचविण्यात दिग्रस पोलिसांना यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here