

सेलू : गावातून गाडी टाकू नको, रस्ता खराब होतो, असे म्हणणाऱ्या युवकाला मारहाण करीत कोयत्याने वार करून जखमी केले. ब्राह्मणी येथे ही घटना घडली. ट्रॅक्टरचालक संदीप टेकाम हा हिवरा गावाजवळ असलेल्या रस्त्यावर वाळू टाकण्यासाठी जात असताना संतोष उत्तम आडे याने त्याला गावातून गाडी टाकू नको, चिखल आहे, असे म्हटले. या कारणातून दोघांत वाद झाला. वादाचा वचपा काढत संदीपने संतोषला मारहाण करीत गालावर कोयत्याने वार करीत त्यास जखमी केले. याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.