

वर्धा : सेलू हद्दीतील मोहगाव, खापरी, शिवणगाव परिसरात ‘वॉश आऊट’ मोहीम राबवून पोलिसांनी नऊ गावठी दारु भट्ट्या उद्ध्वस्त करुन तब्बल ५ लाख २ हजार ८०० रुपयांचा गावठी दारु साठा नष्ट करीत दारु गाळणारे साहित्य जप्त केले. यावेळी दोन दारु भट्टी चालकांना अटक केली.
पोलिसांनी सेलू येथील युवराज बोपचे, गजानन उर्फ गब्बर महादेव गव्हाळे, जागो अजाब आडे, गजानन लिडबे, विनोद पिंपळे, विनोद बुंदे यांच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, अशोक साबळे, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, रणजित काकडे, चंदू बुरंगे, राजू तिवस्कर, गजानन लामसे, पिंटू पिसे, मनिष कांबळे, नवनाथ मुंडे, राजेश जयसिंगपुरे, श्रीकांत खडसे, अमोल ढोबाळे यांनी केली.