
कारंजा : काटोल येथून दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टरने शेतीसाहित्य आणत असताना वलनी शिवारात ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाला. यात चालक मालक शेतकरी हरिराम मारोतराव घागरे यांच्या अंगावर शेतीसाहित्य पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतक हरिराम घागरे यांची तालुक्यातील सेलगाव (उमाटे) येथे शेती आहे. शेतीच्या बाजूने कंपाऊंड करण्यासाठी सिमेंट लोह्याचे पोल तार ट्रॅक्टर क्र. महा 32 ए 9958 यात घेऊन येत होते. मृतक यांचा स्वतःचा ट्रॅक्टर असल्याने ते स्वतः चालवत गेले होते. मात्र, परत येताना त्याचा अपघात झाला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.



















































