

पवनार : येथील पत्रकार सतिश नारायणराव अवचट यांना मदत सामाजीक संस्थेमार्फत या वर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
मदत सामजीक संस्थेच्या वतीने दर वर्षी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणार्या मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. रविवार ता. २० डिसेबर २०२० ला अठरावे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन श्री गुरदेव सेवाश्राम आग्याराम मंदिर जवळ, रमन सायन्सच्या बाजुला सुभाष रोड, नागपूर येथे आयोजीत केले आहे.
या सम्मेलनात पवनार येथील पत्रकार सतिश नारायणराव अवचट यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
पत्रकार सतिश अवचट यांनी सतत भ्रष्टाचार करणार्या विरोधात केलेले लिखान तसेच आपल्या लेखनीच्या माध्यमातुन त्यांनी समाजात कित्येक दिवसापासुन रेगांळत असलेले अनेक प्रकरणे एका मागे एक उघडकीस आणले. तसेच सामान्य जनतेला आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातुन न्याय मिळवुन देण्यासाठी समाजात सुरु असलेले त्यांचे प्रयत्न याच्या आधारावर त्यांना यावर्षीचा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.