

पवनार: वंदनीय राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली,असून कोरोनाच्या प्रकोपमुळे यावर्षी महोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
यामध्ये दररोज पहाटे ध्यान,सकाळी रामधून आयोजीत असून 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. 20 डिसेंबर रोजी ग्रामस्वच्छता व वंदनीय गाडगे बाबा व वंदनीय तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.21 डिसेंबरला सकाळी नगर परिक्रमेनंतर केल्याचे कीर्तन व काल्याचे वाटप करून महोत्सवाची सांगता करण्यात येईल.असे श्री.भागवत सेवा समितीचे कार्यकारी अध्यक्ष नारायणराव गोमासे यांनी कळविले आहे.