तलवार अन्‌ रॉडने युवकास जबर मारहाण! पोलिसांत तक्रार दाखल

वर्धा : पुलाखाली बसून असलेल्या युवकावर दोघांनी तलवार आणि रॉडने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शांतीनगर परिसरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी युवकाच्या मृत्यूपूर्व बयाणावरून २७ रोजी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, तर दुसऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. प्रथम छत्रपती कुसाडे (२१), रा. शांतीनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर कपिल लक्ष्मण शेरेकार असे जखमीचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कपिल शेरेकार हा. शांतीनगर परिसरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली ‘एकटाच बसून असतानाच तेथे प्रथम कुसाडे आणि त्याचा लहान भाऊ आला. कपिलने त्यांना तुम्ही येथे थांबू नका, असे म्हटले असता दोघेही तेथून निघून गेले आणि काही वेळाने दोघांनी हातात तलवार आणि रॉड घेऊन कपिलच्या डोक्यावर व डाव्या हातावर जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. पोलिसांनी जखमी कपिलच्या मृत्यूपूर्वी बयाणावरून आरोपी प्रथमला अटक करून गुन्हा दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी गेडाम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here