युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू! रिधोरा येथील घटना

सेलू : पोहण्याच्या नादात एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सेलू तालुक्‍यातील रिधोरा येथील पंचधारा धरणाच्या धोगऱ्या झरण्यात बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली, राज विजय लांबसोंगे (17) रा.फुलफैल वर्धा असे मृतकाचे नाव आहे.

मृतक राज व त्याचे दोन मित्र दुचाकीने रिधोरा येथील पंचधारा धरणावर फिरायला आले होते. या धरणाच्या मागील भागात असलेल्या घोगरा या डबक्यात त्यांना पोहण्याचा मोह झाला. मृतक राज ने पोहण्यासाठी त्यात उडी घेतली. यातच डुबून त्याचा मृत्यू झाला. या ठिकाणी कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने या ठिकाणी दरवर्षी मृत्यूची श्रुखंलाच असते. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस स्टेशनचे पीएसआय कंगाळे व अनिकेत कोल्हे यांनी भेट पंचनामा करून शवविच्छेदसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here