अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुण जागीच ठार! जाम- नागपूर महामार्गावरील खंडाळा पाटी येथील घटना

वर्धा : भरधाव कंटेनरने समोरुन येणाऱ्या इलेक्ट्रीकवरील दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर २४ रोजी सायंकाळच्या सुमारास झाला. विशेष म्हणजे इलेक्ट्रीकवरील दुचाकी जळून खाक झाली. धनराज शेषराव वासाड (२७), प्रितम जगदीश टेभुंळकर (२५) दोन्ही रा. हिंगणघाट असे मृतकांची नावे आहे.

मृतक धनराज आणि प्रितम हे दोघे बॅटरीवर चालणाऱ्या एम.एच. ३२ एयू. ०६८७ क्रमांकाच्या इलेक्ट्रीक दुचाकीने जामकडून नागपूरकडे जात असताना खंडाळा शिवारात जामकडे भरधाव येणाऱ्या टीएन. ३९ सीबी. २७९९ क्रमांकाच्या कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर दुचाकी जळून कोळसा झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल दहिभाते, पोलीस उपनिरीक्षक पंकज मसरामसह पोलीसांनी अपघातस्थळी जात कंटेनरचालकास अटक केली. अपघातस्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. जाम महामार्ग पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here