वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात कलम 144 लागू

वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघाअंतर्गत एफएलसी ओके ईव्हीएम म्यॅन्युअल ऑन ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन व्हीव्हीपॅट चॅप्टर 1 सेक्शन 1.1 अन्वये सेवाग्राम रोडवरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक 6 मधील स्ट्रॉंगरुम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. याकरीता सदर परीसरामध्ये अनुसचित प्रकार घडू नये याकरीता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गोदाम क्रमांक 6 परिसरात दि.30 नोव्हेंबर पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केली आहे.

दि.6 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत गोदाम क्रमांक 6 च्या 100 मिटरच्या परिसरात 2 अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास अथवा जमा होण्यास निर्बंध घालण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये जमाबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी असे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेशान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here