दुचाकीची धडक! दोघे जखमी; दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : पायदळ जात असलेल्या दोन व्यक्‍तीला विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीचालकाने धडक दिली. त्यात पुरुष-महिला जखमी झाल्याने नागपूर येथे पुढील उपाचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात नँशन हायवे रोड चंदेवानी फाटा, कारंजा येथे घडला.

विलास भाऊराव येसकर (47) रा. खैरी पुर्नवसन, कारंजा याचे बहिण- जावई हे ठाणेगावून पायदळ येते होते. दरम्यान नॅशनल हायव्हे क्र. 06 वर चंदेवानी फाटा येथे विरुद्ध दिशेने येणा-या दुचाका क्र. एम. एच. 40 बी. क्यू 2609 च्या चालक हेमराज चौधरी याने धडक दिली. त्यात बहिण-जावई गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती फोनद्वारे धनजय प्रफुल्ल कडू रा. पिपरी यांनी विलासला दिली होती. विलास येसकर यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलिस ठाण्यात पंकज चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here