दोघांकडून चार तलवारी केल्या जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

वर्धा : तळेगाव परिसरात दोन व्यक्‍ती हत्यारे विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तळेगाव येथे छापा मारुन दोघांना अटक करीत त्यांच्याकडून चार तलवारी जप्त केल्या.

जुगनसिंग बादलसिंग बावरी, निर्मलसिंग अमीचंदसिंग जुनी दोन्ही रा. तळेगाव (श्या. पंत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव परिसरात असलेल्या नॅशनल हायवेवर गस्तीवर असताना पोलिसांना भाष्टी टी पॉईंटवर दोन व्यक्‍ती हत्यारे घेऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा मारुन दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या.

विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही हत्यारे जवळ बाळगली होती. चारही तलवारी जप्त करुन त्यांना तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन करीत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, गजानन लामसे, हमीद शेख,राजेश जयसिंगपूरे, राम इप्पर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here