विद्युत मीटरच्या पेटीला आग! पिपरी (मेघे) शिवारातील घटना; शेतक-यांचे मोठे नुकसान

वर्धा : शेतात असलेल्या विद्युत मीटरच्या पेटीला अचानक आग आगल्याने संपूर्ण मीटर व पेटी जळून खाक झाली. ही घटना पिपरी (मेघे) शिवारात शनिवार सायंकाळीच्या सुमारास घडली. या आगीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, येळाकेळी येथील शेतकरी वैभव वानखेडे यांची शेती पिपरी (मेघे) शिवारात आहे. पिपरी मेघे येथील ओरके यांच्या शेतातील रोहित्र यावरून शेतात विद्युत पुरवठा आहे. 21 एप्रिल रोजी सायंकाळीदरम्यान परिसरात अचानक वादळी वाऱ्यामुळे शिवारातील पुरवठा खंडीत झाला होता. काही वेळानंतर विद्युत पुरवठा सुरु झाल्यानंतर अचाचन शेतातील विद्युत मीटरने पेट घेतला आणि संपूर्ण मीटर व पेटी जवळून खाक झाली. आगीमध्ये स्टँस्टर, ग्रीप, मेन व मीटर जळून खाक झाले. कमी-जास्त विद्युत दाबामुळे शेतातील डीपी जळाल्याचा अंदाज आहे.

शेतकरी वैभव वानखेडे यांच्या शेतात ऊस या पिकांना ओलित सुरु होते. सोबत जनावरांसाठी कडाळू टाकला होता. मात्र, शेतातील संपूर्ण विद्युत मीटर जळून खाक झाल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. या घटनेची माहिती महावितरण विभागाला देण्यात आली. या आगीमुळे झालेले नुकसान देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वैभव वानखेडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here