भीषण अपघातात दोघांचा मृत्यू! फार्मसी कॉलेज जवळील घटना; उभ्या ट्रकला दिली धडक

वर्धा : हिंगणघाट मार्गावर असलेल्या फार्मसी महाविद्यालयाजवळ दुचाकीने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक दिली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी 20 एप्रिल रोजी पावसाच्या सरी कोसळताना घडला. मयुर शंकर निकुडे (22) व मुजाहिद पठाण (23) दोन्ही रा. इझापूर, अशी मृतकांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार मूजाहीद पठाण व मयुर निकुडे हे दोघे मित्र वर्धेवरुन गावाकडे दुचाकी क्र. एम. एच. 32 ए. क्यू 0104 या वाहनाने घराच्या दिशेने जात होते. दरम्यान, हरभऱ्याची पोते घेऊन जाणारा ट्रक क्र. एम. एच. 31 सी. बी. 7854 हिंगणघाटकडे जात होता. दरम्यान, पावसाच्या सरी कोसळत असताना ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रोडवर कुठल्याही प्रकारचे पार्किंग लाइट चालू न ठेवता तसेच रहदारीला अडथळा निर्माण होईल व जिवितास धोका निर्माण होईल, अशा स्थितीत उभा करून हरभरा पावसामुळे भिजल्या जाऊ नये, यासाठी ताडपत्री झाकत होता.

दरम्यान दोघे युवक पावसाचा बचाव करण्यासाठी भरधाव वेगाने या ट्रकला जबर धडक दिली. या धडकेत दोघेही खाली कोसळले आणि घटनास्थळी दोघांचा मृत्यु झाला. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. या घटनेमुळे इंझापूर गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here