

विजयगोपाल : वाळूची वाहतूक करणाऱ्या उभ्या ट्रकला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आगीच्या हवाली केले. ही घटना हिवरा कावरे शिवारात घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विजयगोपाळ येथून जवळ असलेल्या हिवरा कावरे रेती घाटाजवळ किशोर कापसे यांचे शेत आहे. कापसे यांच्या शेताशेजारी उभ्या असलेल्या ट्रकला रात्रीच्या सुमारास हातात तलवारी घेऊनआलेल्या यवतमाळ येथील सुमारे १५ व्यक्तींनी आगीच्या हवाली केले. जाळण्यात आलेला ट्रक यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव या गावातील असल्याची चर्चा घटनास्थळी होती. वाळूच्या वाहतुकीच्या कारणावरून हा ट्रक जाळण्यात आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.