आम्ही अण्णाभाऊंचे वारस आहोत याचा आम्हाला विसर पडतलेला आहे : तुषार उमाळे

पवनार : आजही आमचा समाज इतर समाजाच्या तुलनेत मागे पडतो आहे याच कारण आम्ही अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आदर्शच घेतला नाही त्यामुळे आमचा मातंग समाज प्रगती करु शकलेला नाही आम्ही अण्णाभाऊंचे वारस आहोत याचाही आम्हाला विसर पडलेला आहे आणि हीच खरी शोकांतीका आहे. असे विचार संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी व्यक्त केले. पवनार येथील अण्णाभाऊ साठे नगरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंचा शालिनी आदमने, भिम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल नगराळे, सामाजीक कार्यकर्ते रंजित धोंगडे यांची प्रमुख उपस्थितीत होती.

पुढे बोलताना श्री उमाळे म्हणाले की अण्णाभाऊंसारखे साहित्यरत्न जन्माला घालायचे असतील तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही सोबतच महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेण्याचीही गरज आहे. मात्र इतक्या वर्षानंतरही आमचा समाज आजही झोपलेलाच आहे. त्यांना आजही अण्णाभाऊ, बाबासाहेब, कळालेले नाही आम्ही फक्त १ ऑगस्टलाच जयंती निमीत्यच अण्णाभांऊंचा जयघोष करतो, मात्र त्याचे साहित्य कधीच वाचत नाही मात्र हे चित्र बदलने गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगीतले.

कार्यक्रमाचे संचालन प्रवीण वानखेडे यांनी केले, तर आभार विजय वानखेडे यांनी मानले. यावेळी राजू निखाडे, भगिरथ वानखेडे, शेखर लोखंडे, विठ्ठल पडघान, प्रशांत वानखेडे, सुरज वाढवे, गैरव स्वर्गे, वैभव निखाडे, सोनू मुंगले, भूषण मुंगले आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here