आपला पारंपारीक व्यवसाय सोडून शिक्षणाकडे वळा! मोहन राईकवार

वर्धा : साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगीतल्याप्रमाणे स्वाभीमानाचे जीवण जगा लाचारी पत्करुन नका, आपला पारंपारीक व्यवसाय सोडून शिक्षणाकडे वळा तरच समाजाची प्रगती होइल. असे मत बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हामहासचिव अनोमदर्शी भैसारे, संघटनमंत्री दिनेश वाणी, कार्यालयीन सचिव ओमप्रकाश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री राईकवार म्हणाले अण्णाभाऊंच्या विचारातून प्रेरणा घेऊन गुलामीच्या चिखलातून निघण्यासाठी जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार अंगीकारून स्वाभिमानी बना असे यावेळी म्हणाले.

जयंती निमित्य बहुजन समाज पार्टी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंड प्लॉट वर्धा येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊंच्या पुतळ्याला माल्यार्पन करून मार्गदर्शन करण्यात आले. नंतर नगरपरिषद वर्धाच्या कंपाउंड वालजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भिंतीचित्र कोपऱ्याचे उदघाट्नात सहभागी होऊन खासदार रामदास तडस यांना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळन्यासाठी प्रयत्न करा व लोकसभेत चर्चा घडवून आणावी अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी विविध संघटनांच्या वतीने आयोजित लाक्षणिक उपोषण पेंडॉल मध्ये सहभागी होऊन अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलनास बसपाचा सक्रिय सहभाग असेल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी दिले.

यावेळी सोपानजी कांबळे सुरेश नगराळे, दीपक भगत, दिनेश कांबळे, अॅड. अभिषेक रामटेके, राजेश चन्ने, विवेक गवळी, विशाल रंगारी अंबादास मसराम, शालिक गवळी, कपिल चंदनखेडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here