
सिंदी रेल्वे : पालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणि कंत्राटदारांच्या चालचलावु नियोजनामुळे सात वर्षापासुन या रस्त्यांने जाणार्याला साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाय धुवूनच समोर जावे लागते.
शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील डांगरेपुर्यातुन बाजाराकडे जाणार्या रस्त्यावर श्री चंदनखेडे यांचे घराजवळ सात वर्षापूर्वी अर्धवट सोडलेल्या सिमेंट रस्त्यामुळे पडलेल्या खंड्यात पाऊसाचे पाणी साचुन राहते. परिणामता या रस्त्यांने जाणाऱ्याला येथे पाय ओले करुनच पुढे जावे लागत हे विशेष. या सर्वाना डोळ्याने दिसणार्या छोट्याश्या समस्येकडे सात वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थेचे लक्ष न जाने म्हणजे कोडेच असल्याचे येथील रहीवाशी बोलतात.
ही समस्या निकाली काढण्यासाठी अपुर्ण राहलेला दोनसे फुटाचा रस्ता सुध्दा बनवने गरजेचे नसुन अगदी उंच्चावर आणुन मध्येच सोडलेल्या रस्त्याला बुजवुन केवळ तीन फुटाचा उतार जरी काढला तरी पाणी साचण्यांची ही समस्या निकाली निघु शकते. मात्र कोणी जातीने लक्ष द्यायलाच तयार नाही.
शहरात गरज नाही तीथे लाखो करोडो रुपयाचा नीधी खर्चून रस्त्यावर रस्ते बनविल्याचे नागरीक बोलतात. दर पाचवर्षानी वार्डाचा प्रतीनीधी बदलला की जुण्याच रस्त्यावर नविन सिमेंट रस्ता बनविला जातो. यामुळे रस्त्यालगतचे घर दोन दोन फुट खोलात गेले मात्र रस्त्यावर नविन रस्ता बनविण्याचा हा क्रम काही थांबता-थांबेना. मात्र जे गरजेचे आहे त्याकडे लक्ष का दिले जात नाही. असे नागरीकांचे म्हणने आहे.
शहरात डेंगु ची साथ सुरु आहे. शहराच्या प्रत्येक भागात डेंगु रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामता खबरदारीची उपाययोजना म्हणुन आरोग्य विभाग शहरात दंवडी देऊन कोणीही आपल्या घरी अथवा आजुबाजुला पाऊसाचे पाणी साचु देऊ नये या साचलेल्या पाण्यात अंडीघालुन डेंगुचे डास तयार होतात करीता पाणी साचु न देण्याची खबरदारी घेण्याचे सुचना वजा आवाहन करीत आहेत. हे तर असे झाले “दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाशान” जनेतेला आवाहन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेलाच पडला विसर या छोट्याशा समस्येमुळे रस्त्यांने जाणाऱ्याला अडचन आणि रोगराईस निमंत्रण असा प्रकार मागील सात वर्षांपासुन येथे सुरू आहे.
प्रतिक्रिया
“पहील्याच वर्षी ही समस्या मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला मात्र तत्कालीन नगराध्यक्षा संगीता शेंडे यांनी आपसी मतभेदांमुळे हेतुपुरस्कर दोनदा हे काम रद्द केले. आता विद्यमान नगराध्यक्षा बबिता तुमाने यांनी पदभार स्विकारताच या (‘चंदनखेडे सर ते रवी अवचट यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजी किमंत १८७२६९ /- रुपये) महत्त्वाच्या कामाला पालिकेच्या सभेत मंजुरी मिळुन जिल्हाधिकारी मॅडमच्या अंतीम मंजुरीसाठी सादर करण्यात आले असुन लवकरच मंजुरी प्राप्त होवुन ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्याची मी ग्वाही देतो.
अमोल बोंगाडे, नगरसेवक सिंदी रेल्वे