वाहन चोरट्याला अटक! तीन दुचाकी जप्त

वर्धा : दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल आरोपीस वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात असलेले दोन गुन्हे उघडकीस आणून तीन दुचाकी (किंमत 90 हजार रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत. पंकज ज्ञानेश्‍वर चचाने (28) रा. वाढोना, ता. धामणगाव जि. अमरावती असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राऊतवाडी, नालवाडी येथून दुचाकी क्र. MH 32-L.-1512 घराच्या आवारात ठेवली असता 10 ते 11 फेब्रुवारीच्या रात्री चोरीला गेल्याची तक्रार फिर्यादी पुष्पक प्रमोद भालतडक (वय 28) रा. राऊतवाडी यांनी रामगनर पोलिसांत दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून वर्धा शहरात करीत असतांना मुखबीरकडून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याजवळून दुचाकी क्र. MH-32-L-1512, MH-31-SW5954, MH-28 AW 3948 अशा एकूण तीन दुचाकी (किंमत 90 हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीवरील देवळी, रामनगर व शेगाव येथील पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनि गोपाळ ढोले, सौरभ घरडे, पोलिस अंमलदार गजानन लामसे, नीलेश कट्टोजवार, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, गोपाळ बावणकर आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here