

वर्धा : येथील दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रविन्द्र कोटंबकर यांच्या वाहनांवर सोमवार (ता. १८) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास पवनार रोडवरील पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यात रविन्द्र कोटंबकर व त्यांचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. पवनार येथील काही सामाजीक कार्यकर्त्यांनी जखमींना सेवाग्रामात उपचारार्थ दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचाराकरीता नागपूर येथे हलविण्यात आले.
आपल्या वृत्तपत्र कार्यालयातील काम आटपून श्री कोटंबकर आपल्या चालकासह कारने कोटंब्याला जाण्याकरीता निघाले. दरम्यान दत्तपुरजवळ उडानपुलाखाली दबा धरुन बसलेल्या गुंडांनी कारने वळन घेताच दुचाकी आडवी लावत मागे बसलेल्या एका गुंडाने त्यांच्या गाडीच्या काचावर वार केला. चालकाने कार थांबविताच त्याला मारहान करुन मागाहुन आलेल्या चारचाकी वाहनाने आलेल्या गुंडांनी रविन्द्र कोटंबकर यांच्यावर जीवघेना हल्ला केला. यात त्यांच्या दोन्ही पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्यांना घटनेच्या काही वेळात रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपुर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचा पोलिस विभाग कसुन तपास करीत आहे. पोलिसांच्या अनेक टिम तयार करण्यात आल्या आहे. लवकरच या घटनेचा छडा लागेल अस पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.