बिबट्याने केली गायीची शिकार! शेतात बिबटाच्या पायांचे ठसे; परिसरात भितीचे वातावरण

वर्धा : शेतातील गुरांवर हल्ला चढवून बिबट्याने शेतात बांधुन असलेल्या एका गायीची शिकार केली. ही घटना पवनार शिवारात दिलीप घूगरे यांच्या शेतात शुक्रवार ( ता. ४ ) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांमघ्ये दहशत पसरलेली आहे.

शेतकरी दिलीप घुगरे यांची पवनार शिवारात अडीच ऐकर शेती असून, शेतात त्यांच्या तीन गाई बांधुन होत्या बांधून असलेल्या गुरांवर बिबट्याने मध्यरात्री हल्ला चढविला हल्ला करून एका गायीला नाल्यात फरपटत नेत तिचा फडशा पाडला. सकाळी शेतकरी श्री घूगरे शेतात आले असता त्यांना गाय बांधुन दिसली नाही त्यांनी परिसरातील शेतकर्यांकडे चौकशी केली मात्र गाय दिसली नाही. मात्र गाय बांधलेल्या जागेवर फरपटत नेल्याचे दिसून आले त्या दिसेने पाहत गेले असता नाल्याजवळ गाय मृतावस्थेत आढळली यावरुन गाईची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता या परिसरात बिबटाच्या पायांचे ठसे आढळून आले. घटनास्थळी पंचनामा करीत पशुवौद्यकीय अधिकार्याना बोलवत गायीचा शवविच्छेदन केले. पुढील तपास वनविभागाची चमू करीत आहे.

प्रतिक्रीया…

परिसरात आढळलेल्या पायाच्या ठष्यांवरुन अंदाज बांधने कठीण आहे त्यामुळे वनविभाग आणि पिपल फॉर अँनिमलच्या टिमच्या मदतीने परिसरात सिसिटीव्ही कँमेरे बसविण्यात आलेले आहे. यातून कोणत्या वण्यप्रण्याकडून ही शिकार करण्यात आली याची स्पष्टता होईल. त्यानुसार सामोर कारवाई करण्यास मदत होईल आणि माणव प्राणी यांच्यातील संघर्ष टाळता येईल.

आशिष गोस्वामी, सचिव पिपल फॉर अँनिमल, वर्धा

या परिसरातील ही पहिलीच घटना आहे. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतकरी तसेच शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतात कामाला येण्यास मजुरांनी नकार दिला आहे. या बिबटाचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा गुरांच्या शिकारीच्या घटना वाढत जाईल. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी.

डॉ. नंदकिशोर तोटे, कृषिभूषण शेतकरी पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here