

सिंदी (रेल्वे) : ट्रिपलसीट दुचाकी सुसाट चालवून रस्ता दुभाजकाला जाऊन आदळल्याने, दुचाकीचा अपघात झाल्याने दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले, तर एका वृद्धेच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. कांढळी फाटा येथे हा अपघात १४ रोजी रात्रीच्या सुमारास झाला. या प्रकरणी १५ रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
यश प्रफुल्ल चिंचोळकर रा.हेलोडी हा त्याच्या एम.एच.३२ ए.ई. ८०३६ क्रमांकाच्या दुचाकीवर ट्रिपलसीट निष्काळजीपणे, तसेच हयगयीने वाहन सुसाट पळवित होता. दरम्यान, दुचाकी रस्त्याकडेला असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळल्याने, दुचाकीवरील यश चिंचोळकर आणि एक जण गंभीर जखमी झाला, तर वृद्ध महिला विमल चिंचोळकर यांचा जागीच मृत्यू झाला, या अपघाताची नोंद सिंदी पोलिसात घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.