सावंगी रुग्णालय परिसरात बिबट्या शिरल्याने खळबळ! वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

वर्धा : सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात सकाळदरम्यान एक बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. सकाळदरम्यान हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला. वनविभागासह पोलिसांना माहिती दिली.

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच हा बिबट्या झाडावर बसला असल्याचे आढळले. काही वेळेतच कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावले. मात्र, तो या परिसरतीलच नालीत शिरला. वनविभागचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, रस्त्यालगत असलेल्या नालीतच त्याने आडोसा घेतल्याने रुग्णालय समोरचा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here