
वर्धा : आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारुन तब्बठल नऊ जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ताशपत्त्यांसह एकूण २५ हजार ३८० रुपये जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये सुनील मारोती बांते, प्रितम सुखदेव लोहे, अनुप मोरेश्वर जयसींगपुरे, चंद्रशेखर भारत आसोले, स्वप्नील अरुण कुपाले, इंद्रपाल श्रीधर भगत, विजय रामचंद्र कांबळे, राजेश पांडुरंग भातकुलकर, अमोल अरुण मेंद्रे वांचा समावेश आहे. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीआहे.