ऑनलाईन तिकीट पडली ६.५४ लाखांची! शहर पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : रेल्वेची ऑनलाइन तिकीट काढणे महागात पडले असून सायबर चोरट्याने युवकाच्या बँक खात्यातून परस्पररीत्या तब्बल ६ लाख ५४ हजार रुपये काढून घेत गंडविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रितेश खुशाल चौघरी रा. बोरगाव मेघे हा पुणे येथे नोकरीवर आहे. २० डिसेंबर रोजी त्याने कोपरगाव ते वर्धा ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक केली होती.

मात्र, तिकीट बुक न होताच त्याच्या बँक खात्यातून ३७८७ रुपये कपात झाले. पैसे मिळावे म्हणून त्याने ऑनलाईन ग्राहक क्रमांक शोधला. तसेच संपर्क केला असता अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. पुढील प्रक्रिया करताच सायबर भामट्याने त्याच्या खात्यातून ५ लाख ४८ हजार रुपये परस्पर काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here