विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी ही २ नावं निश्चित ?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह

राज्यात २१ मेला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सूकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावं जवळपास निश्चित झाल्याचं कळतं आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.


शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीची नावही निश्चित झाल्याचं कळतं आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं यापूर्वीच निश्चित झाली आहेत तर आता काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार ठरायचे आहेत.
दुसरीकडे काँग्रेस २ जागांसाठी आग्रही असल्याचं देखील समोर आलं होतं. महाविकासआघाडीने सहावा उमेदवार देखील उभा करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहेविधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु असताना जर आता काँग्रेसने २ जागांसाठी हट्ट केला तर मग निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. सध्याचं संख्याबळ पाहता भाजपचे १०५ आमदार असल्यामुळे चौथी जागा त्यांना मिळू शकते. पण त्यासाठी त्यांना काही अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here