एसटीचे आणखी 12 कर्मचारी निलंबित

वर्धा : एसटी महामंडळाने सोमवारपर्यंत आंदोलनकर्त्या कर्मचा-यांना कामावर रूजू होण्याचा इशारा दिला होता. बहुतांश कर्मचारी कामावर आले नसल्याने एसटी महामंडळाने मंगळवारी 12 कर्मचाऱयांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

आता 1 डिसेंबरपासून राज्यात शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी आंदोलन मागे घेऊन कर्तव्यावर हजर राहावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा नुकताच एसटी प्रशासनाने दिला आहे. असे असले तरी बहुंतांश कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरण होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे म्हणत आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील एसटीची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोळमडली असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच एसटीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. मंगळवारी 12 कर्मचारी निलंबित केले असून वर्धा विभागात आजपर्यंत 200 कर्मचारी निलंबित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here