हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’! गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक

वर्धा : जुन्या वादातून व्यक्तीला तिघांनी रॉडने मारहाण करीत हत्या करुन मृतदेह वरुड रेल्वे लाईनवर फेकून दिला. ही घटना १८ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. असून मंगळवारी याचा उलगडा झाला असून तिन्ही आरोपींना दहेगाव पोलिसांनी अटक केली. दिगांबर नामदेव कन्नाके (रेल्वे) (५०) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक दिगांबर आणि आरोपी संदीप राऊत यांच्यात जूना वाद होता. तीन दिवसांपूर्वी दिगांबर हा शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना आरोपी संदीप राऊत, राजू राऊत आणि किशोर राऊत यांनी रस्त्यात अडवून दिगांबरला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यावर रॉडनेही मारहाण केली. दरम्यान, आरोपींनी जखमी दिगांबरचा मृतदेह वरुड रे. परिसरात असलेल्या रेल्वे पटरीवर फेकून दिला. याचा तपास दहेगाव पोलिसांनी केला असता ही सर्व बाब उघड झाल्याने आरोपींना हत्येचा गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here