
पुलगाव : चोरट्याने घरासमोर बांधून ठेवलेल्या शेळ्यांचे दावे कापून ४० हजार रुपये किमतीच्या शेळ्या चोरून नेल्या. गांधी चौकात ही घटना घडली. गुरुनामसिंग बावरी यांनी त्यांच्या मालकीच्या शेळ्या घरासमोरील अंगणात दावं लावून बांधून ठेवल्या होत्या. चोरट्याने रात्रीच्या सुमारास ४० हजार किमतीच्या शेळ्या चोरून नेल्या. याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.