वरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता ढवळे तर उपसरपंचपदी आशिष ताकसांडे यांची निवड! ग्रामस्थांनी केले अभिनंदन

वर्धा : वरुड ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता ढवळे आणि उपसरपंच आशिष ताकसांडे यांची निवड करण्यात आली. वरुड ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाकरिता सोमवारी ता 15 फेब्रुवारी निवडणूक ग्रापंचायत कार्यालयात घेण्यात आली होती.

यावेळी उत्क्रांती पॅनलच्या वतीने सरपंच पदाकरिता सुनीता ढवळे तर उपसरपंच करिता आशिष ताकसांडे तर दुसऱ्या गटाकडून सरपंच करीता वैशाली शिंदे ,उपसरपंच करीता इंदिरा भोंगाडे यांनी नामांकन पत्र दाखल केले. दुपारी तीन वाजता मतदान घेण्यात आले सरपंच पदाकरिता सुनीता ढवळे याना 8 मते, वैशाली शिंदे यांना 7 मते मिळाली. उपसरपंचकरिता आशिष ताकसांडे याना 8 मते ,इंदिरा भोंगाडे याना 7 मते मिळाली ,सरपंच करिता सुनीता ढवळे आणि उपसरपंच आशिष ताकसांडे हे विजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री देशमुख तलाठी बोरकर, ग्रामविकास अधिकारी मनोहर चांदूरकर यांनी काम पाहिले. सुनीता ढवळे आणि आशिष ताकसांडे यांचे गावात सर्वत्र अभिननंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here