बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यावर कु-हाड हल्ला! आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

आष्टी (शहीद) : बँकेच्या कर्ज हप्त्याची वसुली करण्यास गेलेल्या वसुली कर्मचाऱ्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना २३ रोजी दुपारच्य सुमारास मुबारकपूर गावात घडली याप्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

पंढरी हरिदास डाहुले आणि पुष्पक माहूरे हे दोघेही दुचाकीने बँकेची वसुली करण्यासाठी मुबारकपूर येथील रहिवासी योगेश गजाम याच्या घरी गेले. त्यांना पैशांची मागणी केली असता योगेशने बाहेर बसण्यास सांगितले आणि काही वेळाने घरातून कुऱ्हाड आणून पंढरीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here