जिंवंत असल्याचे प्रमाणपत्र दिले का? अन्यथा आता पेन्शन होणार बंद! हयातीचा पुरावा तातडीने बँकेकडे सादर करा

आर्वी : पेन्शनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला घेऊन पेन्शनसाठी बँकेत हेलपाटे मारावे लागतात. तुम्ही हयात आहात की नाही, याचा पुरावा बँकांकडे दरवर्षी द्यावा लागतो. अन्यथा, पेन्शन बंद केली जाते. जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंत ठीक परंतु वयोवृद्धांना बँकांचे हेलपाटे मारणे खूपच त्रासदायक असते. बर्‍याचदा त्यांना आज नको उद्या या, असेही सांगितले जाते. निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरळीत सुरू राहावे, यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

जिल्हा कोषागार आणि सर्व तालुका कोषागार कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहे. निवृत्तीवेतन जमा होणार्‍या बँकांमध्येही ही सोय केली जाणार असल्याने यापुढे संबंधित कर्मचाऱ्यांना हयातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी बँकेत किंवा कोषागारामध्ये प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार नाही. मार्गदर्शनासाठी हेल्पडेस्क सुरू करण्यात येणार आहे. २६१२१२१५ या क्र. सेवानिवृत्तांना माहिती दिली जाणार आहे. ही. सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर जुनी पद्धत पूर्णपणे बंद होणार नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांकडे बायोमेट्रिक यंत्र असेल, तर त्यांना नोंदणीची प्रक्रिया अँन्ड्रॉइड टॅब, स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरदेखील करता येणार आहे. त्यामुळे तातडीने आपला हयातीचा दाखला सादर करणेआवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here