पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू! दोन चिमुकल्यांचे छत्र हरवले

मांडगाव : मांडगावच्या परिवाराचा चहांद येथे झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला होता तर कारमधील अन्य 4 जण जखमी झाले होते. त्यापैकी कारचालक स्व. कैलास चंदनखेडे यांच्या पत्नी मंजूषा चंदनखेडे (38) यांचाही 12 दिवसानंतर उपचारादरम्यान, नागपूर येथे मृत्यू झाला. त्यामुळे दोन चिमुकल्यांचे माता-पित्याचे छत्र हरवले आहे.

वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे ही घटना घडली होती. मांडगाव येथून सासुरवाडीला आपला परिवार घेऊन गाडी नंबर एमएच 30 पी 3131 ने जात होते. दरम्यान पुलावर ही दुर्दैवी घटना घडली होती. यात चालक कैलास चंदनखेडे (वय 42) हे जागीच ठार झाले होते. तर त्यांच्या पत्नी मंजूषा कैलास चंदनखेडे (वय 38) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी राळेगाववरून नागपूर येथे हलविण्यात आले होते. अखेर 12 दिवसानंतर त्यांची मृत्यूशी झूंज संपली व अखेरचा श्‍वास घेतला. गुडिया चंदनखेडे (वय 12) व स्वरा चंदनखेडे (वय 8) यांचे आई-वडीलांचे छत्र हरवले आहे. या घटनेने मांडगावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here