रोकड पळविणाऱ्या चोरट्या महिला जाळ्यात

पुलगाव : महिलेच्या पर्समधून रोख रक्‍कम काढून पळत असलेल्या तीन चोरट्या महिलांना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पुलगाव पोलिसांनी केली. सायली विनायक काळे ही पुलगाव येथील भगतसिंग चौकात असलेल्या दुकानात खरेदी करीत असताना तीन अज्ञात महिलांनी काळे यांच्या पर्समधून दीड हजार रुपये नकळत काढून पळ काढला.

याची तक्रार पुलगाव पोलिसांना माहिती होताच ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कळमकर, खुशालपंत राठोड, बाबुलाल पंढरे, जयदीप जाधव, मुकेश वांदिले यांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही चोरट्या महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी यमुना शंकर उफाडे, दुर्गा मनोज हातागडे, राणी राजू हातागडे तिन्ही रा. यवतमाळ यांना अटक करुन त्यांच्याकडून दीड हजार रुपये रोख हस्तगत केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here