खून प्रकरणातील तीन आरोपी गजाआड! सराईत गुन्हेगार : दोघांचा शोध सुरू

देवळी : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या विवाहित मुलाला ठार म्रारणाऱ्या आरोपी अरुण याच्याव्यतिरिक्त आणखी दोन आरोपींना पोलिसांनी वर्ध्यातून अटक केली. आतीष गवळी, आकाश खोंडे दोन्ही रा. बोरगाव असे आरोपीचे नाव आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून गवळी याच्यावर हिंगणघाट येथे खुनासह इतर गुन्हे दाखल आहेत. खोंडे याच्यावर रेल्वेत चोऱ्या करण्याचे गुन्हे दाखल आहे.

मुंबईत भटकत असताना पैसे संपल्यामुळे ते बुधवारी वर्ध्यात आले होते. पैसे घेवून पुन्हा मध्यप्रदेशाकडे रवाना होण्यापर्वीच देवळी पोलिसांनी त्यांना अटक केली. या हत्याकांडात पाच आरोपींचा समावेश्च असून तीन आरोपी गजाआड झाले आहे. उर्वरित दोन आरोपींमध्ये आकाशचे वडील संजय खोंडे व स्वप्निल जुनघरे यांचा समावेश आहे. या दोन्ही आरोपींचे लोकेशन यवतमाळ जिल्ह्यात दाखवत आहे.

दहा दिवसांपूर्वी केदार लेआऊट येथे भरदुपारी हत्यांकाड घडला. मृताचे वडील अरुण याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध व घरगुती संपत्तीवरुन हा वाद विकोपाला गेला. मुख्य आरोपी अरुण रामटेके याची पहिली पत्नी कौसल्या, मुलगा दीपक व सून सुनीता नागपूरला राहत होते. पत्नी कौसल्याला नोकरीमुळे वेळोवेळी देवळीला येणे जमत नव्हते. त्यामुळे अरुणने भिडी येथील सुनंदा नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले.

सुनंदाच्या मालकीचे केदार लेआऊट येथे राहते घर, ब्लॉक व प्लॉट असल्याने आरोपी तिच्यासोबत देवळीला राहत होता. परंतु, काही वर्षांतच सुनंदाची प्रकृती बिघडल्याने तिने वैशाली नावाच्या मुलीला दत्तक घेतले. त्या दरम्यान सुनंदा मरण पावल्याने अरुणचे पहिली पत्नी कौसल्याकडे जाणे येणे सुरू
झाले. सुनंदाची प्रॉपर्टी असल्याने कौसल्या देवळीला येत होती. परंतु, या दरण्यान अरुणचे पुन्हा दुसर्‍या महिलेसोबत सुत जपल्याच्या माहितीवरून कुटुंबीयांचे त्याच्याकडे लक्ष होते. त्यामुळे पत्री कौसल्या, मुलगा दीपक व दीपकची पत्नी सुनिता यांनी अचानक देवळीला येवून शहानिशा केली असता आरोपी अरुण दुसऱ्या महिलेसोबत नको त्या स्थितीत आढळून आला.

यावेळी दीपक व कौसल्याने अरुणला घराबाहेर हाकलून दिले. याचा राग मनात ठेवून अरुणने बोरगाव मेघे येथील सुनंदाच्या दत्तक मुलीचे घर गाठून त्यांना देवळी येथील राहते घर व प्रॉपर्टीसोबत भडकाविले. त्यामुळे त्याच रात्री दत्तक मुलीचा नवरा आकाश खोंडे, सासरा संजय खोंडे यांनी आतिष गवळी व इतरांना सोबत घेवून दीपक रामटेके याच्या खुनाचा कट रचला. गेल्या दहा दिवसांपासून या गुन्ह्याच्या शोधात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार कुणाल हिवसे, उमेश गेडाम, परवेज खान, पठाण, योगेश वानखेडे परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here