सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण

वर्धा : जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आकांशा या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत अँडव्हांस डिप्लोमा ईन साँप्टवेअर प्रोग्रामिंगअभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा जिल्हयातील पात्र युवती व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे 18 महिने कालावधीचे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकासावर भर देण्यात येणार असून तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षित लाभार्थींनी नामांकित कंपनी व स्टार्टअप मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण महिलांसाठी मोफत असून निवासी स्वरुपाचे असणार आहे.

प्रशिक्षणाकरीता लाभार्थ्यांचे वय 17 ते 28 वर्ष असावे. किमान 12 वी पास व आयटीआय पास असणे आवश्यक आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांचे पालक शासकीय नोकरीत नसावे. प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी सुरु असून प्रशिक्षण प्रवेशाकरीता दि.30 जुलै पर्यंत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. तर 7 ऑगस्टला ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here