

आर्वी : सायंकाळी अचानक भादोड पुनर्वसन परिसरात असलेल्या विद्युत रोहित्राने पेट घेतला. त्यामुळे सुमारे दोन तास परिसराचा वीजपुरवठा ठप्प झाला. होता कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली.
भादोड पुनर्वसन येथील महावितरणच्या रोहित्राला अचानक आग लागली. यामुळे परिसरात सर्वत्र काळोख पसरला होता. याची माहिती गौतम अशोक कुंभारे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ कनिष्ठ अभियंता दातीर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. कर्मचाऱ्यांनी गौतम कुंभारे यांच्या मदतीने आग विझवून वीजपुरवठा सुरळीत करून दिला.