
गिरड : भरधाव सुमोने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास उमरेड मार्गावरील शक्करबाहुली शिवारात झाला. लक्ष्मण नत्थुजी बावणे, रा. नागरी, ता, वरोरा, जि. चंद्रपूर असे मृताचे नाव आहे. गिरडपासून अवघ्या काही. किमी अंतरावर शक्करबाहुली भागात एम, एच. ०४ बी. एन. ४६८४ क्रमांकाच्या सुमोने समोरून येणाऱ्या एम, एच. ३४ एक्स, ४४६८ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील लक्ष्मण बावणे हे गंभीर जखमी झाले.
अपघात झाल्याचे लक्षात येताच वैभव किसना डंभारे, रा, गिरड व विशाल , रा. धोंडगाव यांनी त्यांची दुचाकी थांबवून अपघाताची माहिती गिरड पोलिसांना दिली. माहिती मिळताच गिरड पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमी लक्ष्मणला गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले;पण वाटेतच गंभीर जखमीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गिरड पोलिसांनी आरोपी सुमो चालक शुभम भास्कर सोनकर, रा. बोथली, ता. समुद्रपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील दहीभाते. करीत आहेत. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.


















































