लग्नास नकार दिल्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी! पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या युवकाने चक्क युवतीचे खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सावंगी पोलिसात ५ मार्च रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. भूगाव येथील २४ वर्षीय युवतीची सूरज मारबदे, रा. राजुरा, जि. अमरावती याच्याशी फेसबुकवरून मैत्री झाली. आरोपी सूरजने युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत लगनाची गळ घातली. मात्र, युवतीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या सूरजने युवतीचे खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीने सावंगी पोलिसात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here