पती होता असमर्थ! सुनेला केली सासऱ्यासोबत संबंध ठेवण्याची सक्ती; पतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : पती संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याने त्याने चक्क विवाहितेला सासऱ्याशीच संबंध ठेवण्याची सक्ती केली. ही लज्जास्पद घटना घडली असून, याप्रकरणी आर्वी ठाण्यात विवाहितेने तक्रार दाखल केल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, विवाहितेचे लग्न धीरज वानखेडे, रा. गुंजखेडा याच्याशी आर्वी येथे २२ ऑक्टोबर २०२० मध्ये रीतिरीवाजाने झाले होते. विवाहिता पतीसह पनवेल येथे राहत होती. लग्नानंतर पती धीरज हा पत्नीशी संबंध ठेवण्यास तयार नव्हता. विवाहितेने त्यास याबाबतची विचारणा केली असता तिच्याशी वाद करून शिवीगाळ करायचा. काही कालावधी उलटल्यावर सासरे रामकृष्ण पारणू वानखेडे हे पनवेल येथे राहण्यास आले असता पतीने सासऱ्याशी संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली.

याला विवाहितेने प्रखर विरोध केला असता पती व सासऱ्यांनी विवाहितेस बेदम मारहाण केली. अखेर विवाहितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली असता घरच्यांनी विवाहितेस आर्वी पोलीस ठाण्यात नेत तक्रार दाखल केली. आर्वी पोलिसांनी पतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी

विवाहितेला सासऱ्याच्या खोलीत झोपण्यासाठी पती धीरज हा जबरदस्ती करीत होता. सासऱ्याने अनेकदा संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. मात्र, विवाहितेने याला विरोध केला. यामुळे पती आणि सासरा विवाहितेला ही बाब कुणालाही सांगितली तर समुद्रात फेकून संपवून टाकण्याची धमकी देत होते. बळजबरीने घरातील खोलीत डांबून ठेवत होते, असा आरोप विवाहितेने तक्रारीतून केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here