आमचा संकल्‍पच भारताच्या समृद्धीचे साधन होय – कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल

वर्धा : भारताचा नागरिक दर वर्षी नवी स्वप्ने, आकांक्षा व चिरपुरातन संकल्‍पासह एकत्र येतो व राष्‍ट्रध्‍वजा प्रति सन्मान प्रदर्शित करत देशासाठी काही करावे ही भावना व्यक्त करतो. नागरिकांच्‍या योगदानाचा हा संकल्‍प वैश्‍विक व राष्‍ट्रीय दृष्टीने भारताच्या समृद्धीचे एकमेव साधन होय असे प्रतिपादन महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी स्‍वातंत्र्यदिनी ध्‍वजारोहरणानंतर उपस्थितांना संबोधित करतांना केले. ते म्हणाले, ‘आज़ादी का अमृत महोत्‍सव’ कार्यक्रम गेल्या 23 मार्चपासून सुरु झाला.

महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेने स्‍वातंत्र्यासाठी सविनय अवज्ञा व जनजागरणातून सुराज्य व स्‍वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न 75 वर्ष पूर्ण होईल तोवर ब-याच अंशी पूर्ण झालेले असेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. राष्‍ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्‍लेख करत ते म्हणाले की विश्‍वविद्यालयाने या धोरणावर एक पुस्‍तक काढले. क्रियान्‍वयनाच्या दिशेनेही अग्रेसर असल्याचे सांगून ते म्हणाले अभ्यासक्रमात परिवर्तन करत भारताच्या नवनिर्मितीसाठी शिक्षित युवा तयार करण्याच्या दिशेने कृतसंकल्पित आहोत.

राष्‍ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात पुनर्रचनेचा उल्लेख करत ते म्‍हणाले की आयआयटी आणि एनआयटीचे शिक्षण 6 भारतीय भाषांमध्‍ये सुरू झाले असून चिकित्‍साशास्‍त्राचेही शिक्षण आता भारतीय भाषांमध्‍ये उपलब्‍ध होणार आहे. कोरोना कालखंडातील आव्‍हानांचा सामना करत शिक्षण धोरण लागू करण्‍यासाठी स्‍वत:ला तयार केले आहे या दृ‍ष्‍टीने विश्‍वविद्यालयाने ऑनलाइन माध्‍यमातून दोनशेहून अधिक संवादाचे कार्यक्रम आयोजित केले. नवी आव्‍हाने स्‍वीकारुन सम्मिश्र पद्धतीने शिक्षणाची सवय लावली पाहिजे असेही ते म्‍हणाले.

विश्‍वविद्यालयाच्‍या भावी योजनांची माहिती देतांना ते म्‍हणाले की विद्यार्थ्‍यांच्‍या विकासासाठी एनसीसीचे अध्‍ययन सुरू करण्‍यात येत असून त्‍याचे एककही स्‍थापन केले जाणार आहे. विश्‍वविद्यालयाच्‍या मानांकनात सुधारणा झाली आहे. येत्‍या काळात देशातील श्रेष्‍ठ विश्‍वविद्यालयात निश्चित स्‍थान प्राप्‍त होईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

आंतरराष्‍ट्रीय ओळख निर्माण करण्‍यासाठी काळाचे हिंदी भाषा शिक्षण ऑनलाइन सुरू करण्‍यात येणार आहे असे सांगून ते म्‍हणाले की भारतीय सांस्‍कृतिक संबंध परिषदेच्‍या सहकार्याने विविध देशांबरोबर हे अभ्‍यासक्रम चालू करण्‍यात येतील व त्‍याचा प्रारंभ 16 सप्‍टेंबरपासून भूटानसोबत करण्‍यात येईल. महात्‍मा गांधी यांच्‍या विचाराला अनुसरून भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍यासोबत सामंजस्‍य करार करण्‍यात आले आहे. यामुळे शांतता आणि अहिंसेवर आधारित किमान यंत्र व कमाल मनुष्‍यबळाचा प्रयोग करत कार्यक्रम तयार करण्‍यात येणार आहेत अशी माहिती त्‍यांनी दिली.

ध्‍वजारोहणाआधी प्रो. शुक्‍ल यांनी गांधी हिलवर महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळयाला माल्‍यार्पण केले. ध्‍वजारोहण प्रसंगी प्रकुलगुरु द्वय प्रो. हनुमान प्रसाद शुक्‍ल व प्रो. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान, अधिष्‍ठातागण, विभागप्रमुख आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here